औरंगाबाद शहराकरिता पर्यायी पाणीपुरवठा योजना
औरंगाबाद शहरासाठी 400 वर्षापूर्वी मलीकांबरने
केलेल्या नहरीव्दारे पाणी पुरवठा
योजनेमध्ये नैसर्गिक उतार व गुरुत्वाकर्षनाचा उपयोग केलेला आहे. यासाठी
हर्सूल, सावंगी या 620 मी. तलांकावरील डोंगरभागाचा उपयोग केलेला आहे. या डोंगराळ
भागात भूगर्भात मुरलेले पाणी नहरीव्दारे शहरामध्ये आणलेले आहे. जायकवाडी धरण
झाल्यानंतर मात्र औरंगाबाद व त्याच्या आसपासचा सर्व भाग, उद्योग जायकवाडी धरणाच्या
पाण्यावर विसंबून राहू लागलेला आहे. असे करण्यामुळे आपल्या भागात जे पाणी नैसर्गिकरित्या
जवळच उपलब्ध होवू शकते त्याचा वापर करण्याबाबत हळूहळू विसर पडत गेला व आता सर्वजण
जायकवाडीच्या पाण्यावर विसंबून राहू लागलेले आहेत. औरंगाबाद, वाळूज, शेंद्रा उद्योग, जालना व
पैठण ते औरंगाबाद यातील सर्व गांवे जायकवाडीवर विसंबवण्याच्या धोरण आखत आहेत.
कातपूर, गंगापूर, कावसान, नारळा, मानवत, गळनिंब, बोधेगाव, हातगांव, ढोरकीन,
बाळानगर, घारी, बाबरगाव, प्रवरासंगम अशी असंख्य गावे (200 गावे ) जायकवाडीवर आधारीत पाणीपुरवठा योजना आखत आहेत. प्रश्न असा आहे की खरेच या सर्व भागातील पाणी
संपून गेले आहे का? या गावांना स्थानिक उपाययोजना करुन पाणी
देणे अशक्य आहे का? जायकवाडी व्यतिरिक्त पाणी मिळणे औरंगाबादसह इतर शेकडो गावांना खरेच
अशक्य आहे का?
सध्याचीस्थिती:-
औरंगाबाद व आसपासच्या 15 लक्ष वस्ती साठी दररोजची पाणी मागणी 202 दशलक्ष लीटर (MLD) असून उद्योगासाठी 55 दशलक्षलीटर अशी एकूण 257 दशलक्षलीटर आहे. वार्षिक गरज 95 दलघमी आहे . हे पाणी 55 कि.मी. अंतरावरील जायकवाडीतून आणावे लागते. जायकवाडी पाणीपातळी 454 आहे तर औरंगाबाद 550 ते 580 मीटर वर आहे. अश्यारीतीने 106 मी उंचीवर हे पाणी उपसून आणण्यासाठी दरवर्षी 32 कोटी रुपयांची वीज खर्च होते. जायकवाडीतील पाणी शुध्दीकरण करण्यासाठी फारोळा येथे जलशुध्दीकरण यंत्रणा बसविलेली आहे. लोकसंख्या वाढीमुळे दर वर्षी पाण्याची मागणी वाढत आहे. प्रस्तावीत मुंबई-दिल्ली औद्योगीक पटयामुळे पाण्याची गरज आणखीच वाढणार आहे. सध्याच औरंगाबाद महानगरपालीका नविन विकासीत होत असणा-या भागास पाणी पुरवठा करीत नाही. तसेच आसपास वाढणा-या देवळाई, सातारा, हर्सूल इतर भागात महानगरपालीका पाणी पूरवू शकत नसल्याने हा भाग विहिरी व बोअर यावर अवलंबून आहे. महानगरपालीका क्षेत्रातही बोअर घेण्यावर फार मोठा भर आहे. जागोजागी बोअर घेण्यामूळे जमिनीतील पाणी पातळी दिवसंदिवस खोल जत आहे. यासर्वकारणामुळे आता औरंगाबाद व आसपासच्या परिसरासाठी पर्यायी उपाययोजना आखणे अत्यंत गरजेचे आहे.
औरंगाबाद व त्याचा परिसर 642 चौ.कि.मी. एवढा विस्तीर्ण आहे. चा भागात दरवर्षी 672 मीमी पाऊस पडतो. म्हणजेच दरवर्षी पावसाचे 432 दशलक्ष घनमीटर शुध्द पाणी दरवर्षी उपलब्ध होत असते. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांनी वापरता येणार नाही असे पाणी वगळले तरीही 302 दलघमी पाणी दरवर्षी उपलब्ध होते.औरंगाबाद परिसरात अश्या रीतीने दरवर्षी लागणा-या 95 दलघमी पाण्यापेक्षा उपलब्ध होणारे 302 दलघमी पाणी पाहता असे लक्षात येईलकी किमान 3 पट पाणी आहे परंतू त्याची साठवण न केल्याने आपणास पाणीटंचाई भासते . औरंगाबाद शहरात जटवाडा, नायगाव, सावंगी, देवळाई,
सातारा, ईटखेडा या भागातील डोंगरावरील पाणी येते. वाळूज औद्योगीकक्षेत्रात मिटमिटा, भावसिंगपूरा,
पडेगाव या भागातील चार मोठया औढयांचे पाणी तीसगाव येथे येवून त्याचे रुपांतर देवागीरी नदीत होवून हि नदी ए.एस. क्लब जवळ खामनदीस मिळते. औरंगाबादच्या डोंगराचा तलांक 800 मी आहे याचा अर्थ असा आहे की आपण 800 मी तलांकावर पडणारे पाणी जायकवाडीत 454
तलाकांपर्यंत वीना अडथळा वाहून जावू देतो व पून्हा विज खर्चून 55
कि.मी. लांबीवरुन 106
मी उंचीपर्यंत उपसा करुन वापरतो. उपलब्ध पाण्यापैकी जेवढे पाणी अडविणे व मुरविणे शक्य आहे तेवढे पाणी त्या त्या ठिकाणी अडविल्यास व मुरविल्यास आपल्याला शुध्द पाणी कमी विज वापरुन उपलब्ध होवु शकते.
Ø पाणी अडविण्यास उपलब्ध जागा व किती पाणी आडविता येईल याचा अंदाज
शेरा
|
उपलब्ध पाणी साठा अंदाजे
|
30 टक्के पाणी वजा जाता उपलब्ध होणारे पाणी
|
672 मीमी पावूस झाल्यास
मिळणारे पाणी
|
क्षेत्रचौ.कि.मी.
|
पाणलोटाचे नांव
|
हर्सूल तलाव व इतर तलाव
|
5.0 दलघमी
|
33.4 दलघमी
|
47.7 दलघमी
|
71
|
1. हर्सूल तलाव
|
सांगवी तलाव व इतर
|
2.5 दलघमी
|
19.30 दलघमी
|
27.5 दलघमी
|
41
|
2. सावंगी तलाव
|
परिसरातील लहान तलाव
|
1.5 दलघमी
|
13.20 दलघमी
|
18.80 दलघमी
|
28
|
3. सातारा परिसर
|
परिसरातील लहान तलाव
|
1.00 दलघमी
|
32.90 दलघमी
|
47.0 दलघमी
|
70
|
4. तिसगांव एएस ब्लब
|
टेंभापूरी प्रकल्प
|
25.00 दलघमी
|
144.40 दलघमी
|
206.30 दलघमी
|
307
|
5. टेंभापूरी
|
सुकना प्रकल्प
|
14.0 दलघमी
|
43.3 दलघमी
|
61.80 दलघमी
|
92
|
6. चिकलठाणा
|
परिसरातील लहान तलाव
|
1.0 दलघमी
|
15.50 दलघमी
|
22.20 दलघमी
|
33
|
7. शेंद्रा
|
50.00 दलघमी
|
302.00 दलघमी
|
431.30 दलघमी
|
642
|
एकूण
|

I appreciate with u sir. for Aurangabad i will be helpful,if we do the such planning.
ReplyDeleteDoing good work.keep it up !!!!!
Thanks Ashish . Pl read other posts
ReplyDeleteThanks Ashish . Pl read other posts
ReplyDelete